
SmartOffice Attendance Desktop Base software User guide
या लेखामध्ये आपण स्मार्ट ऑफिस बायोमेट्रिक अट्टेण्डन्स सॉफ्टवेअर चे डेस्कटॉप बेस चे संपूर्ण इंस्टॉलेशन आणि महत्वाच्या सेटिंग्स आणि function पहाणार आहोत , काळजीपूर्वक वाचून सेटिंग करा तर काहीही error येणार नाही या लेखामध्ये तुम्हाला SmartOffice सॉफ्टवेअरची सेटअप, वापर आणि समस्या निवारण याबद्दल माहिती मिळेल.यामध्ये बायोमेट्रिक integration, कर्मचारी व्यवस्थापन, आणि रिपोर्ट तपशीलवार अहवाल यासारख्या सुविधा आहेत.
अनुक्रमणिका
Table of Contents
How to smart office attendance system software download and install
सॉफ्टवेअर डाऊन्लोड कसे करावे- Download desktop version
सॉफ्टवेअर डाऊनलोड करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला latest म्हणजे नवीन सॉफ्टवेअर मिळेल.
file डाऊनलोड झाले नंतर त्या मध्ये डबल क्लिक करून RUN ला क्लिक करून इंस्टॉलेशन पूर्ण करावे
Full permission देणे
त्यानंतर तुम्हाला desktop वर smart office चा आयकॉन / logo तयार झालेला दिसेल , म्हणजे तुमचे इंस्टॉलेशन झाले आहे , पण आता काही महत्वाची सेटिंग करावी लागतील म्हणजे सॉफ्टवेअर वापरताना काही error येणार नाही , त्यासाठी प्रथम डेस्कटॉप वरच्या लोगो ला आणि ज्या ड्राईव्ह वर सॉफ्टवेअर चा डेटा बेस झाला आहे त्या फोल्डर ला full permition देणे आहे , त्यासाठी स्मार्टऑफिस icon ला right क्लिक करा , आणि properties मध्ये जा नंतर security मध्ये Edit ला क्लिक करा ,तिथे ऍड असा function वर क्लिक करा आणि खाली चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तिथे everyone सिलेक्ट करून FULL CONTROL द्या नंतर Aply करून Save करा ,
Select Biometric Device Type: What type of device is a biometric
आपले बायोमेट्रिक कोणते type चे आहे ते आधी सिलेक्ट करा Select Biometric
Smart Office Suit डेस्कटॉप सॉफ्टवेर मध्ये बायोमेट्रिक मशीन कनेक्ट करण्याआधी ते मशीन चे technologies कोणती आहे ,हे माहिती असायला हवे पण ते तंत्रज्ञान आपल्यासाठी सोपे करून देणेसाठी इथे फक्त शॉर्टकट key म्हणजे अक्षर निवडायचे आहे , ते खालील प्रमाणे
N-SERIES BIOMAX ब्रँड साठी
V -SERIES BIOMAX ब्रँड साठी
K -SERIES ESSL ब्रँड साठी
K -SERIES Z -TECHO ब्रँड साठी
AI -SERIES नवीन आलेल्या FACE च्या काही device साठी
आता हे आपल्याला कसे माहित होणार कि आपले Device कोणत्या Series चे आहे यासाठी काही मदत हवी असेल तर आपण आमचे कस्टमर केअर बरोबर संपर्क करू शकता tel:9294606060
यानंतर आपलेला पुढील स्टेप मशीन आणि सॉफ्टवेअर यामध्ये डेटा ची कनेक्टिविटी करणे
Biometric device management मध्ये Lan / Wi -Fi /USB ची सेटिंग करून घ्या
Utilities
↓
Device
utilities मध्ये जाऊन Device ला क्लिक करून आतमध्ये जे पेज ओपन होईल त्यामध्ये खाली Footer ला Add new /Edit /Delete असे options मिळतील , त्यामध्ये Add new वर क्लिक केले तर खालील चित्र प्रमाणे पेज दिसेल
Device Name: यामध्ये तुमच्या माहिती साठी नाव द्यावे आणि तेच कॉपी करून
Short Name टाकावेSerial Number: मध्ये biometric मशीन चे सिरीयल नंबर टाकावा , तो तुम्हला मशीन च्या Device info मध्ये मिळेल
- आता इथे आपल्याला Connection Type मध्ये 2 option मिळतील .जर आपण LAN CABLE ची सेटिंग करणार असाल ते TCP/IP हे सिलेक्ट करा आणि खालील सेटिंग करा, आणि जर डाटा USB ने घेणार असला तर USB सिलेक्ट करून save करा (इथे Test connection होणार नाही )
IP Address: या सेटिंग मध्ये तो ip टाका जो तुम्ही बायोमेट्रिक मशीन च्या नेटवर्क सेटिंग मध्ये टाकलेला आहे
- Machine Id मध्ये जर आपल्याला एक पेक्षा जास्त मशीन कनेक्ट करायच्या असतील तर त्यांना ओळखण्यासाठी हि सेटिंग केली जाते ,(डिफॉल्ट Id 1 असतो ) या ठिकाणी जो ID तुम्ही टाकणार आहेत तोच नम्बर बायोमेट्रिक मशीन मध्ये पण टाकायचा आहे , तसेच Comm key हे सुद्धा टाकता येते , हे option वापरणे गरजेचे नाही ते तुम्ही रिकामे पण सोडू शकता , पण हे option फक्त मशीन आणि सॉफ्टवेअर मधील connectivity सुरक्षित ठेवण्यासाठी असते
त्यानंतर Test Connection → connection successful आले तर →Save करा →आणि Close करा
Download Attendance Data via LAN Cable/Wi-Fi or USB in Smart Office Desktop-Based Software
Software मध्ये Lan cable किंवा वायफाय ने डेटा कसा घ्यावा
सोप्या स्टेप करा वरील चित्रामध्ये दाखवलेला प्रमाणे Device type सिलेक्ट करा नंतर खाली जे IP Address दिले आहेत त्याला चौकटी मध्ये सिलेक्ट करा आणि Download Logs ला क्लीक करा , मग जे IP आपण सिलेक्ट केला आहे तिथे connecting असे येईल आणि data सॉफ्टवेअर मध्ये जमा होईल
Software मध्ये USB/pen drive ने डेटा घेणेसाठी
Utilities
↓
Import Device Logs
utilities मध्ये जाऊन Import Device Logs ला क्लिक करून आतमध्ये जे पेज ओपन होईल त्यामध्ये खालील options मिळतील खालील चित्र प्रमाणे पेज दिसेल ,
➤यासाठी प्रथम Device मध्ये USB सिलेक्ट करावे
➤नंतर Browse मध्ये जाऊन ती file select करा जी आपण USB/PEN DRIVE मध्ये घेतली आहे (बायोमेट्रिक मशीन मधून file कशी घायची याचे User Guide पहावे )
🗹create employees ला टिक मार्क लावा करा →आणि Import करा
✔डेटा इम्पोर्ट झाला तर successful चा message येईल आणि उजव्या बाजूला तसे statues दिसेल , नंतर हे function बंद करून पुढील सेटिंग्स करावे
Master setting smart office suite attendance management system
Master setting मध्ये काही settings स्मॉल आणि सोप्या आहेत आणि जे मोठे settings आहेत त्याचे User Manual वेगळे पेज वर आहे त्याची लिंक खाली आहे तिथे क्लिक करून ती सेटिंग पाहता येईल
प्रथम Company/ Branch सेटिंग करणे खूप सोपे आहे इथे एकापेक्षा जास्त कंपनी Add करता येतात ,तसेच Department, Location, public holiday, एम्प्लॉयमेंट मास्टर मधून Employment type ,Grade ,Team ,Designation सुद्धा add करावे
Category , Shift च्या सेटिंग्स केलेल्या असतील तर आता पुढे Employees असे option आहे त्यामधून एम्प्लॉयीस चे सर्व माहिती आणि Rules द्यावे.Category , Shift च्या सेटिंग्स लिंक खाली आहे तिथे क्लिक करून ती सेटिंग पाहता येईल
एम्प्लॉइ ची माहिती भरणे,सेटिंग्स: Employee Basic Info
- Employee Name –कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव एंटर करा
- Employee Code-जर Edit करत असाल तर employee code आणि device code तिथे आहे तोच ठेवावा ,बदलू नये , आणि जर ऍड करत असाल तर नवीन कोड दोन्ही ठिकाणी टाकावा , पण इथे लक्षात असू द्या जो कोड Device कोड मध्ये वापरला आहे तोच कोड बायोमेट्रिक मशीन मध्ये एम्प्लॉयी add करताना द्यावा त्यामध्ये फरक नको
- Photo & Gender – तुमच्याकडे कॉम्पुटर मध्ये फोटो असेल तर तो इथे उपलोड करता येईल , तसेच MALE /FEMALE सिलेक्ट करता येईल
company/ Branch ,Department, Category, Shift Group, Location हे सर्व आधीच तयार करून ठेवावे लागते ते आता फक्त सिलेक्ट करायचे आहे .
रिपोर्ट काढणे रिपोर्ट जनरेट करणे - Report Generate
रिपोर्ट काढणे साठी प्रथम Report असे वरच्या लाईनमधले option वर क्लिक करावे , मग खालील चित्रामध्ये प्रमाणे एक चौकट दिसेल ,तिथे आधीचे सर्व सिलेक्ट केलेलं असू द्यावे नसेल तर सुरवातीची तारीख आणि शेवट ची तारीख असे निवडावे आहि खाली बाण दाखवलेले आहे तिथे Recalculate Attendance ला क्लिक करावे
Recalculate Attendance करून झाले कि पुन्हा रिपोर्ट मध्ये जाऊन तिथे असणारे वेगळे -वेगळे प्रकारचे रिपोर्ट असतात जसे Daily Report ,Weekly Report ,Monthly Report ,आणि Leave चे पण रिपोर्ट इथून काढता येतील. आपल्याला जो रिपोर्ट योग्य वाटत असेल तो रिपोर्ट तुम्ही तयार करून त्याला Download करून घेऊ शकता त्यासाठी रिपोर्ट च्या आतमध्ये वरती Export असे option मिळेल त्यामधून Excel ,Word ,PDF अशा फॉरमॅट मध्ये रिपोर्ट घेता येतात ,आणि जर प्रिंट हवी असेल तर तिथेच प्रिंटर चे सुद्धा option मिळेल , रिपोर्ट तयार करताना काही फिल्टर वापरून तुम्हाला हवा तसा रिपोर्ट तयार करून मिळेल , ते खाली चित्रामध्ये दाखवलेले आहे
📈 रिपोर्ट तयार करताना आधी Group by मध्ये आणि त्याचा शेजारीच Sort by असे वेगळेवेगळे फिल्टर आहेत ते सिलेक्ट करा
📅 त्यानंतर From Date म्हणजे रिपोर्ट कधीपासून पाहिजे आणि To Date मध्ये रिपोर्ट कधीपर्यंतचा पाहिजे ते तारीख द्यावी
↡ Report Type मधून रेपोर्टचा कोणता प्रकार हवा तो घ्यावा
🗹 Filter Employees असे जे option आहे त्यामध्ये टिक मार्क करून जर एखादया एम्प्लॉयीस चा रिपोर्ट पाहिजे असेल तर इथे कोड किंवा नाव टाकून रिपोर्ट काढता येतो ,आणि सर्वांचा पाहिजे तर इथे फिल्टर न लावता पुढचे फिल्टर वापरा पुढे कंपनी किंवा डिपार्टमेंट फिल्टर करता येतात
हे सर्व झाले कि खाली डाव्या साईडला 🗹 Recalculate Attendance ला टिकमार्क करा
👉 आणि शेवटी उजव्या बाजूचे Generate ला क्लिक करा , मग तुम्हाला हवा असेलला रिपोर्ट तयार होऊन येईल











